राजकारण, प्रसारमाध्यमे आणि पैसा
आपल्यापैकी बऱ्याच जणांना अधूनमधून असा ‘भास’ होतो की प्रसारमाध्यमे ही केवळ श्रीमंत आणि सबळ लोकांच्या प्रचारकांसारखी वागतात. सर्वसामान्यांना माहिती पुरवण्याऐवजी माध्यमे काहीतरी ‘खपवत’ असतात, असा दृष्टिकोन ठेवल्यास त्यांची वर्तणूक जास्त नेमकेपणाने दिसते. [नोम चोम्स्की आणि एड्वर्ड एस. हर्मन ह्यांच्या प्रसारमाध्यमांबाबतच्या ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट’ या ग्रंथाचा परिचय आजचा सुधारकच्या वाचकांना लवकरच करून दिला जाणार आहे. हा विषय …